संवेदने सुरू केलेल्या उपक्रमानुसार प्रशांतकडून खो घेऊन याठिकाणी माझ्या आवडत्या दोन कविता टाकतेय. तसं आवडलेलं खूप आहे. त्यातून २ निवडायच्या म्हणजे मुश्कील आहे पण तरी एक सुरूवात...
त्यापूर्वी संवेदने दिलेले खो-खोचे नियम इथे सर्वांच्या सोयीसाठी देतो.
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा.
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेवढ्या कविता तेवढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सार्यांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तिचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)
पु. शि. रेग्यांची 'त्रिधा राधा'
आकाश निळे तो हरी
अन एक चांदणी राधा
बावरी...
युगानुयुगीची मनबाधा!
विस्तीर्ण भुई गोविंद
अन क्षेत्र साळीचे राधा
विश्रब्ध..
युगानुयुगीची प्रियंवदा!
जलवाहीनी निश्चल कृष्ण
बन झुकले काठी राधा
विप्रश्न..
युगानुयुगीची चिरतंद्रा!
मला अत्यंत आवडणारी ही रेग्यांची त्रिधा राधा. का विचाराल तर खूप नीरस बडबड करेन पण त्यापेक्षा अनुभवाच ना कवितेतलं राधेचं प्रेम!!
------------
मायबोली या संकेतस्थळावर उदयाला आलेल्या पेशवा या कवीची ही मला आवडलेली एक कविता. त्याच्या परवानगीने इथे टाकतेय.
कविता, काव्य, संवेदना सगळ्याच बद्दल बोलून गेलाय या ठिकाणी.
इटालिक्स मधल्या ओळी माझ्या खास आवडीच्या.
मी कविता करतो हा आरोप
बिल्कुल करू नका माझ्यावर..
निसर्गाची लाज वाटणारी माणसे
नग्न अक्षरांना झाकतात
दर्जेदार शिवलेल्या कपड्याने...
त्यांना असते
रूजामे घातलेली मैफिल..
विस्फोटानंतर उरलेले रक्तलांच्छित ढीग
रचता येत नाहीत मला
मनिप्लांटसारखे सुशोभित कुंड्यातून..
म्हणून मैफिलीबाहेर मी आंगठे धरून
उभं रहायला तयार आहे...
दिखावू भरलेपण घेउन
हिंदाळत नाही महासागर...
हिंदाळणारा एक थेंबही जर
नसेल तुमच्या शरीरपेल्यात
तर दारावर पावसाला बोलावू नका.
तुम्हाला भिजणे जमणार नाही.
त्याहूनही गडद ते उमजणार नाही...
पुन्हा कविता करतो हा आरोप
कृपा करून करू नका..
तुम्ही नाकारलेत भोगून जाणे
हा माझा गुन्हा नाही..
पुढच्या वेळेस
अंगठे धरणारही नाही
आणि कापणारही नाही.
भले तुम्ही द्रोण बनून आलात तरी....
- मायबोलीवरचा पेशवा (जयवंत काकडे)
---------------------
माझा खो जास्वंदी आणि योगेश यांना

पेशव्यांची कविता जबरदस्त आहे
aga mala kho dilyabaddal thanx!
pan mala already kho milala hota aga, ani mi post pan takli hoti!
त्रिधा राधा सुंदर असं माझं सर्टिफिकेट आवश्यक नाहीच तरीही...:)
Donhi kawita surekh.
दोन्ही अप्रतिम!
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होणार आहे -
http://marathi-e-sabha.blogspot.com/
सहभागी होण्याकरता shabdabandha@gmail.com येथे ईमेलद्वारे लवकरात लवकर संपर्क करावा.
धन्यवाद.
-प्रशांत